दिल्लीपाठोपाठ उत्तराखंड आणि गुजरातमध्ये मॅगी न्यूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मॅगीच्या मसाल्यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने बुधवारी रात्री उशीरा उत्तराखंडमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊनच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकार यांनी सांगितले. गुरुवारी गुजरातमध्येही मॅगीवर एक महिन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला. गुजरातचे आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी ही माहिती दिली.
उधमसिंग नगर जिल्ह्यामध्ये मॅगीच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्ली सरकारनेही बुधवारीच मॅगीच्या विक्रीवर १५ दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तेथे घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader