मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
१. BEST STRIKE – संप चिघळण्याची चिन्हे, विद्युत पुरवठा विभागही होऊ शकतो सहभागी
आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत. वाचा सविस्तर..
२. ‘बेस्ट’ पाठोपाठ मोनो रेलचे कर्मचारीही संपावर ?
बेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठ मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा पवित्रा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनो रेलचे १९८ कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. वाचा सविस्तर..
३. संमेलनाचे उद्घाटन आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते!
नयनतारा सहगलप्रकरणी वादंग सुरूच असताना शेतकरी आत्महत्यांचा दाखला देत किसान न्याय हक्क समितीने संमेलन उधळण्याचा दिलेला इशारा लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. वाचा सविस्तर..
४. मध्यरात्री उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची घेतली भेट; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधील (बीकेसी) एका हॉटेलमध्ये मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप भेट घेतली, असा खळबळजनक दावा राष्ट्र्वादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी केला. वाचा सविस्तर..
५. आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाविरोधात स्वयंसेवी संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका
खुल्या प्रवर्गातील गरीबांना १० टक्के आरक्षण देणारे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर २४ तासांच्या आतच एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) अपेक्षेप्रमाणे गुरुवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. वाचा सविस्तर..