मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
१. देशभरातील वाहतूक कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर
आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील वाहतूक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून आजपासून दोन दिवस (दि.८, ९) ते संपावर असणार आहेत. वाचा सविस्तर..
२. बेस्टचा संप सुरु, मुंबईकरांचे हाल
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बेस्ट प्रशासन गंभीर नाही त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सुमारे ३०,५०० बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. वाचा सविस्तर..
३. गुजरात: धावत्या ट्रेनमध्ये भाजपाच्या माजी आमदाराची गोळी घालून हत्या
गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. वाचा सविस्तर..
४. भाजपा नेत्याने मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून वाटल्या दारुच्या बाटल्या
भाजपा नेत्याच्या मुलाने मंदिरामध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर..
५. Video : राम मंदिराबाबत मणिशंकर अय्यरांचे वादग्रस्त वक्तव्य; पहा… काय म्हणाले?
राम मंदिरावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर..