मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. ‘खान’ असल्यानेच आमिर आणि नसीर टार्गेट, अमोल पालेकरांचा आरोप

खान असल्यानेच आमिर, नसीरुद्दीन यांना टार्गेट केलं जात आहे असा आरोप ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी पुण्यात केला. वाचा सविस्तर..

२. कृषी विद्यापीठांत वेतन घोटाळ्याचे पीक!

राज्यातील चार कृषी विद्यापीठांतील ८०० प्राध्यापकांना बेकायदा वेतनवाढ देऊन सुमारे २५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर..

३. धक्कादायक! ठाण्यातील पालिका रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न

कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाचा सविस्तर..

४. ‘ठाकरे’ चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात

महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास आगामी ‘ठाकरे’ या चित्रपटातून उलगडणार आहे. पण त्यापूर्वी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला आहे. वाचा सविस्तर..

५. IND vs AUS : पदार्पणातच मयंकचे अर्धशतक, अशी कामगिरी करणारा दुसराच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. मयंकने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी केली आहे. वाचा सविस्तर..

Story img Loader