मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. अडकलेल्या ट्रेकर्सची हरिश्चंद्रगडावरून उतरण्यास सुरुवात

हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगदरम्यान अडकून पडलेल्या कल्याणच्या २० ट्रेकर्सनी गड उतरायला सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी अंधार पडल्यानंतर त्यांना मार्ग सापडत नव्हता. दरम्यान त्यांच्या मदतीसाठी इतर ट्रेकर्स आणि प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. वाचा सविस्तर..

२. मुंबई हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ५० लाख डॉलर्सचे बक्षीस

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे. या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार पाकिस्तानने ही कारवाई करावी, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. वाचा सविस्तर..

३. ‘पुन्हा २६/११ सारखा हल्ला झाल्यास युद्धाची शक्यता’

पाकिस्तानातून २६/११ सारखा मोठा दहशतवादी हल्ला पुन्हा झाल्यास युद्ध सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिला आहे. मुंबईतील हल्ल्यास दहा वर्षे २६ नोव्हेंबरला (आज) पूर्ण होत आहेत. वाचा सविस्तर..

४. परदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशाची माहिती देण्यास ‘पीएमओ’चा नकार

परदेशातून किती काळा पैसा परत आणला याचा तपशील देण्यास पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशानंतरही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. चौकशी व गुन्हेगारांवरील खटल्यात अडथळे ठरू शकणारी माहिती देऊ नये अशी तरतूद माहिती अधिकार कायद्यात आहे, त्यानुसार काळ्या पैशाबाबत माहिती नाकारण्यात येत आहे, असे सांगून पंतप्रधान कार्यालयाने माहिती देण्याचे टाळले आहे. वाचा सविस्तर..

५. मितालीप्रमाणं मलाही संघाबाहेर काढलं होतं, सौरव गांगुलीची खदखद

भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून अचानक वगळल्याचे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. करिअरमध्ये ऐनभरात असताना मलाही असेच संघाबाहेर काढण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे. वाचा सविस्तर