मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
1. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस, मुंबईकरांचे अतोनात हाल
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून आज संपाचा आठवा दिवस आहे. बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाचा सविस्तर..
2. आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचला होता; निलेश राणेंचे बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. वाचा सविस्तर..
3. ‘बाळासाहेब ठाकरेंनी रचला होता सोनू निगमच्या हत्येचा कट’
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सनसनाटी आरोप करत खळबळ माजवून दिली आहे. वाचा सविस्तर..
4. मुंबई पोलिसांनीही हार्दिक पांड्या, राहुलची काढली ‘विकेट’; ट्विट केला ‘हा’ फोटो
‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना मुंबई पोलिसांनीदेखील चांगलीच चपराक लगावली आहे. वाचा सविस्तर..
5. नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटात झळकणार रिंकू-आकाशची जोडी
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत प्रसिद्धी मिळवणारी आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर..