मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
१. ..तर राज्याचा डोलारा कोसळेल; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांवर नेम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यावरुन शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. वाचा सविस्तर..
२. Farmers march: शेतकऱ्यांचे आज दिल्लीत शक्तिप्रदर्शन
कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी देशातील हजारो शेतकरी आज (शुक्रवारी) दिल्लीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. रामलीला मैदानावरून शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार असून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. वाचा सविस्तर..
३. आता धनगर समाजालाही आरक्षण
मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळाने गुरुवारी एकमुखी मान्यता दिली. यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत असतानाच, आता धनगर समाजासही न्यायालयात टिकेल अशा ठोस तरतुदींसह आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातच दिली. वाचा सविस्तर..
४. दुबई-मुंबई दरम्यान समुद्राखालून धावणार रेल्वे ?
हायपरलूप आणि चालकविरहित उडणाऱ्या कारनंतर संयुक्त अरब अमिरात (यूएई) आता आणखी एका महत्वकांक्षी प्रकल्पाचा विचार करत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प भारताशी निगडीत आहे. नजीकच्या काळात दुबई आणि मुंबईदरम्यान समुद्रातील पाण्याखालून रेल्वे धावू शकते. वाचा सविस्तर..
५. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेपूर्वीच भारताला धक्का, पृथ्वी शॉला दुखापत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वीच धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापत झाली असून तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..