मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
१. राफेल कराराची चौकशी होणार की नाही, सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय
फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या व्यवहाराचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट शुक्रवारी निर्णय देणार आहे. वाचा सविस्तर..
२. संताप ओळखा अन्यथा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो: शिवसेना</strong>
शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छनास्पद असून सरकारने शेतकऱ्यांचा संताप ओळखावा अन्यथा आज स्वतःला गळफास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो, असा इशाराच शिवसेनेने दिला आहे. वाचा सविस्तर..
३. कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. वाचा सविस्तर..
४. राजस्थानात पेच कायम, सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेस प्रवक्त्याचा राजीनामा
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन होणार हे निश्चीत असलं तरीही काँग्रेसच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचं चित्रं स्पष्ट झालंय मात्र अद्याप राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. वाचा सविस्तर..
५. बँक कर्मचाऱ्यांचा संप, पाच दिवस बँका बंद
बँकेची जर काही महत्त्वाची कामं असतील तर ती 20 तारखेच्या आधीच करुन घ्या, जर 20 तारखेपर्यंत बँकेची कामं केली नाहीत तर तुम्हाला बरेच दिवस वाट पाहावी लागेल. कारण 20 तारखेनंतर 5 दिवस बँका बंद असणार आहेत. वाचा सविस्तर..