मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
1. शरद पवारांना दुष्काळाचे चांगले ज्ञान पण पाणी, शेतीबाबत कोणत्या योजना राबविल्या? – उद्धव ठाकरे</strong>
महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. शेवटचे मतदान संपताच शरद पवार यांनी राज्यभरात दुष्काळी दौरे सुरू केले. दुष्काळ निवारणासाठी सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. वाचा सविस्तर..
2. सरन्यायाधीश निर्दोष!
एका माजी कर्मचारी महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपात सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निर्दोष असल्याचा आणि हे आरोप निराधार असल्याचा निर्वाळा याप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने दिला आहे. वाचा सविस्तर..
3. भगवी साडी नेसल्याने मी ‘साध्वी स्वरा भास्कर’ होईन का?
मी भगवी साडी नेसले तर मी साध्वी स्वरा भास्कर होईन का? असा प्रश्न विचारत भोपाळच्या एका पत्रकार परिषदेत अभिनेत्री स्वरा भास्करने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर..
4. सरकार स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज – राम माधव
सरकार स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज भासेल, असे विश्लेषण भाजप सरचिटणीस राम माधव यांनी एका मुलाखतीत केले आहे. वाचा सविस्तर..
5. निवडणूक काळात खादीची विक्रमी उलाढाल
निवडणुकीच्या काळात खादीला चांगले दिवस आले आहेत. खादीशी संबंधित पोशाखांच्या विक्रीत यंदाच्या आर्थिक वर्षांत विक्रमी २९ टक्के इतकी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर..