मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. ठाकरे बंधू एकत्र येणार का?, राज ठाकरे म्हणाले…

विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी हे उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर..

२. सरन्यायाधीशांच्या राजीनाम्यासाठी कारस्थान!

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राजीनाम्यास भाग पाडण्यासाठी त्यांना लैंगिक छळाच्या प्रकरणाता गोवण्याचा कट आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा एका वकिलाने केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने या वकिलाकडून म्हणणे मागवले आहे. वाचा सविस्तर..

३. जनावरांच्या छावण्यांमध्ये शेतकऱ्यांचीही पथारी!

दुष्काळामुळे चारा-पाणीटंचाई निर्माण झाल्याने सरकारने छावण्या सुरू केल्या आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी निम्मे कुटुंब या छावण्यांत राबत असून, छावणीतील गोठय़ांतच दुष्काळग्रस्तांनी पथारी घातल्याचे चित्र नगरमध्ये दिसते. वाचा सविस्तर..

४. बारामतीचे ‘पार्सल’ परत पाठवा! मुख्यमंत्र्यांचे कामोठेत आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि चिल्ले पिल्ले उभे केले. बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवायची हीच वेळ आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कामोठे येथे केली. वाचा सविस्तर..

५. हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वेवर बुधवारी सकाळी मानखुर्द स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले. वाचा सविस्तर..