एपी, माराकेश : Morocco Earthquake Death Toll मोरोक्कोतील विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. तसेच किमान दोन हजार ५९ लोक जखमी झाले आहेत. देशाच्या गृह मंत्रालयाने शनिवारी उशिरा दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे झालेल्या या भूकंपात दोन हजार १२ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका दुर्गम भागात बसला आहे. तेथे बचावपथकांना पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अल हौज प्रांतात सर्वाधिक एक हजार २९३ जण मृत्युमुखी पडले आहेत. दोन हजार ५९ जखमींपैकी एक हजार ४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे. भूकंपानंतर मोरोक्कोच्या सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मोरोक्कोमध्ये  ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप गेल्या १२० वर्षांत देशातील सर्वात भीषण विध्वंसंक भूकंप ठरला. अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत जाहीर केली आहे. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत असताना हे दुर्दैवी वृत्त कळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर नमद केले होते, की मोरोक्कोतील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. या दु:खद प्रसंगी मोरोक्कोवासीयांसोबत आहोत.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

‘भारतीय भूकंपबाधित नाहीत’

रबात : मोरोक्कोत झालेल्या विनाशकारी भूकंपाने भारतीय नागरिक बाधित झाले नसल्याची सध्याची माहिती येथील भारतीय दूतावासाने दिली. दूतावासाने मोरोक्कोतील सर्व भारतीयांना संयम बाळगून स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. येथील भारतीय समुदायाच्या संपर्कात दूतावास असून, अद्यापपर्यंत भारतीय नागरिक भूकंपबाधित असल्याचे वृत्त नाही.