Moscow-Goa Flight Bomb Threat : मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथकाच्या तपासानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – धर्मातराला राजकीय रंग नको! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, उपाययोजनांबाबत सरकारकडे विचारणा  

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या दूतावासाला मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यांनी लगेच याची माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

दरम्यान, या विमानात २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स असून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी गुजरात पोलीस, बॉम्ब शोधक पथक तसेच एनएसजी कमांडोही दाखल झाले असल्याची माहिती जामनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरभ पारघी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moscow goa chartered flight emergency landing after bomb threat spb