वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरण अजूनही शमललेले नाही. या मशिदीबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. असे असताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काशी अर्थात वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील ईदगाह यावर मोठे भाष्य केले आहे. भाजपाच्या अजेंड्यावर काशी आणि मथुरा नाही. याबाबत न्यायालय निर्णय घेईल असे नड्डा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >> वाहतूककोंडी टाळण्यासाठी शिमल्यातील शाळांना सुट्टी; शहराची झाली पोलीस छावणी
“काशी आणि मथुरा वाद भाजपाच्या अजेंड्यावर नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राम मंदिराबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही ठराव मंजूर करण्यात आलेला नाही,” असे जेपी नड्डी म्हणाले. याबाबतचे सविस्तर वृत्त टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.
हेही वाचा >> “…तर मी तुला लगेच १० हजार रुपये देईन”; भर बैठकीत ममता बॅनर्जींची कार्यकर्त्याला ऑफर; संवाद ऐकून तुम्हालाही येईल हसू
तसेच “आम्ही नेहमीच सांस्कृतिक विकासाबाबत बोलत आलेलो आहोत. मात्र काशी आणि मथुरासारख्या विषयावर न्यायालय निर्णय देईल. न्यायालय जो निर्णय देईल त्याची अंमलबजावणी करण्याचं काम भाजपा करेल,” असेही नड्डा म्हणाले. तसेच मोदी सरकारच्या सबका साथ आणि सबका विकास या घोषणेला अधोरेखित करत न्याय या तत्वासाठी भाजपने नेहमी काम केलेले आहे, असे दावा नड्डा यांनी केला.
दरम्यान, सध्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही मशीद इदगाह ही दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. असा असताना जेपी नड्डा यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे.