ओबीसी, अनुसूचित जाती व जमातीचे लोक अधिक भ्रष्ट असल्याचे खळबळजनक विधान आज (शनिवार) जेष्ठ राजकीय आशिष नंदी यांनी केले. जयपुर साहित्य महोत्सवात त्यांच्या या विधानामुळे मोठा गोंधळ उडाला.
महोत्सवात पॅनल चर्चेदरम्यान नंदी म्हणाले की, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील लोक सर्वाधिक भ्रष्ट असतात.
चर्चेत या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या पत्रकार आशुतोष आणि प्रेषकांमध्ये बसलेल्या काही लोकांनी या विधानावर आक्षेप घेतला.
आशुतोष म्हणाले की, ‘‘ मी पहिल्यांदाच अशाप्रकारचे विधान ऐकत आहे. ब्राह्मण आणि सवर्ण जातीच्या लोकांनी सर्व प्रकारचे भ्रष्टाचार करून झाले आहेत पण जेव्हा कोणी खालच्या जातीची व्यक्ती त्यांच्यासोबत बरोबरी करू पाहतो तेव्हा त्याला चुकीचे मानण्यात येते. त्यामुळे अशाप्रकारचे विधान योग्य नाही.’’
नंदी म्हणाले की, भ्रष्टाचार करणारे अधिकाधिक लोक ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील असतात आणि जोपपर्यंत हे तालत राहिल तोपर्यंत भारतीय प्रजासत्ताक जिवंत राहिल. नंदी यांच्या या विधानावर प्रेषकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.
दरम्यान, नंदी यांनी नंतर हे स्पष्ट केले की, त्यांचे म्हणणे होते ज्या लोकांना पकडले जाते, ते ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील असतात कारण त्यांच्याकडे सवर्ण जातींमधील लोकांसारखे स्वत:ला वाचवण्याची साधने नसतात.
ते म्हणाले की, तुम्ही एका गरीब व्यक्तिला वीस रूपयेची ब्लॅक टिकीट विकताना पकडलात तर म्हणतात हा भ्रष्टाचार आहे परंतू लाखोंचा भ्रष्टाचार करणारे श्रीमंत लोक आरामात बचावतात.
‘विचारांचा प्रजासत्ताक’ कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये बोलताना पत्रकार, लेखक तरूण तेजपाल म्हणाले की, भ्रष्टाचार सर्व वर्गामध्ये आहे.

Story img Loader