कोट्यावधी माणसांनी आणि ७१ टक्के पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीवर नगण्य जीवजंतू, वनस्पती, प्राणी आहेत. माणसांची शिकार करणाऱ्या प्राण्यांची संख्याही खूप आहे. मात्र, सापासारखा उभयचर प्राणी समोर दिसल्यावर भल्या भल्यांची बोबडी वळल्याशिवाय राहत नाही. विषारी सापांच्या दंशाने काही तासाभरातच अनेकांना जीव गमवावं लागलं आहे. त्यामुळे माणसांना सापांपासून जितकं दूर राहता येईल तितकंच त्यांच्यासाठी चागलं. पण ब्राझिलमध्ये एका ठिकाणी माणसांची नाही तर चक्क सापांची दुनिया आहे. ब्राझिलच्या स्नेक-आयलॅंडवर जगातील सर्वात विषारी साप आहेत. आयलॅंडवर असलेल्या अशा घातक सापांच्या वास्तव्यामुळं लोकांना याठिकाणापासून दूरच ठेवण्यात आलं आहे.
‘इल्हा दा क्यूईमाडा ग्रांडे’ (Ilha da Queimada Grande) असं या स्नेक आयलॅंडचं नाव आहे. हे आयलॅंड साओ पावलोपासून 90 किमीच्या अंतरावर आहे. लोकांना या बेटावर जाण्यास बंदी आहे. जर कोणाला या ठिकाणी जायचं असेल, तर ब्राझिलच्या सैनिकांकडूनच याबाबतची परवानगी दिली जाते. ज्यामुळे भेट देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसह सापांचीही काळजी घेतली जाते. काही शास्त्रज्ञ आणि सैनिकांनाच या बेटावर जाण्याची परवानगी देण्यात आलीय.
इथे आहेत जगातील सर्वात विषारी साप
ब्राझिलमधील या बेटावर मोठ्या प्रमाणावर विषारी सापांचं वास्तव्य आहे. यामध्ये गोल्डन लॅंसहेड आणि ब्रोथ्रोप्स इंसुलारिस यांचाही समावेश आहे. हा एक मोठा साप आहे. विशेष म्हणजे या सापाची वाढ २० इंचाहून अधिक होते. हे साप पक्षांना खातात. त्यामुळे त्यांचं विष खूप वेगानं काम करतं. सापाने एखाद्या पक्षाला दंश केल्यावर त्या पक्षाचा लगेच मृत्यू होतो. गोल्डन लॅसहेड शिकार करणाऱ्या प्राण्याला ट्रॅक करू शकत नाहीत. तसंच या सापांचं विष इतकं घातक असतं की, दंश केल्यावर माणसांच्या शरीरातील अवयवही पिघळतात. या बेटावर प्रती वर्ग पाच मीटरच्या अंतरावर साप आढळतात. इथे खतरनाक सापांचा वावर असल्याने पक्षीही या ठिकाणी यायला घाबरतात.
सापांनाही या गोष्टींचा धोका
एव्हढ्या विषारी सापांना कुणाची भीती असणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या सापांनाही भीती आहे. माणसांना हे साप घाबरतात. गोल्डन लॅसहेड सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. त्यामुळे शास्त्रज्ञानांही या सापांचं संशोधन करण्यात रस आहे. तसंच या सापांची शिकार करण्याचाही काही जण प्रयत्न करतात. शिकारी या सापांना पकडून अवैधरित्या बाजारात विक्री करतात. या बेटावर एक लाईटहाऊस आहे. या ठिकाणी पूर्वी मानवी वस्ती होती, हा मेसेज देण्यासाठी हा लाईटहाऊस लावण्यात आला आहे.