हैदराबाद शहरातील एका कॉलनीत दरोडा टाकण्यासाठी दोघेजण एका घरात शिरले. यावेळी घरात एक मुलगी आणि तिची आई अशा दोघीच होत्या. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांजवळ बंदुकीसह इतर शस्त्रं होती. मात्र, तरीही न घाबरता माय-लेकी थेट चोरांना भिडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी तात्काळ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सशस्त्र दरोडेखोरांशी लढलेल्या या माय-लेकींच्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके काय घडले?

दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमिता महनोत आणि त्यांच्या मुलीकडे बंदूक रोखत घरातील पैसे आणि सोन्याच्या वस्तू दरोडेखोरांनी मागितल्या. मात्र, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या दोन व्यक्तींना माय-लेकींनी चांगलाच धडा शिकवला. घरात शिरलेल्या दोघांपैकी एकाला पकडत चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तर एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. या दोन चोरांपैकी एकाचे नाव सुशील कुमार आणि दुसऱ्याचे नाव प्रेमचंद्र असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : “…तर मी २०१४लाच दिल्लीत गेले असते”, पंकजा मुंडेंचं उमेदवारीवर भाष्य; म्हणाल्या, “यंदा चर्चा न करताच घोषणा झाली!”

दरोडा पूर्वनियोजित होता

दरोडा टाकण्यासाठी ज्या घरी चोर आले, त्याच घरी चोर काही वर्षांपूर्वी काम करत होते. त्यांनी काही दिवस तेथे काम केले. या दरोडेखोरांना त्या घरातील सोन्याच्या वस्तू आणि घरातील पैसे नेमके कुठे ठेवतात? याबाबत माहिती समजल्यानंतर ते काम सोडून पळून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट घरात दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून माय-लेकींचा सत्कार

या प्रकरणातील दोघा दरोडेखोरांवर हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहिणी प्रियदर्शिनी यांनी अमिता महनोत आणि त्यांच्या मुलीचा सत्कार करत माय-लेकींच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दरोडेखोर कुरिअर देण्याच्या बहाण्याने घरात शिरले. त्यातील एकाने आपली ओळख पटू नये, या हेतूने हेल्मेट घातले होते. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother and daughter fought the thieves and hyderabad police commit robbery arrested marathi news gkt