Crime News in Bhopal : आई आणि दोन भावांनी मिळून तिसऱ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घरी चिकन बनवण्यास सांगितल्यामुळे दोन भावांनी तिसऱ्या भावाची हत्या केली. भोपाळ येथील बैरागढ येथील इंद्र नगरमध्ये येथे हा प्रकार घडलाय. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत अंशुल यादव (२०) हा मूळचा विदिशा जिल्ह्यातील शमशाबादचा आहे. त्याचे वडील शिवराम यादव गवंडी म्हणून काम करतात. अंशुल हा त्याची आई अनिता यादव, अमन यादव आणि कुलदीप यादव यांच्यासह बैरागढ येथील इंद्र नगरमध्ये राहत होता. तिन्ही भाऊ खासगी नोकरी करत असून त्यांना दारूचं व्यसन होतं.

हेही वाचा >> Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरच्या रात्री तिन्ही भावांनी दारू प्राशन केले होते. नंतर अंशुलने घरीच चिकन बनवण्याचा आग्रह धरला. याला आई आणि भावांनी विरोध दर्शवला. त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. भांडण वाढत जाऊन अमन आणि कुलदीपने अंशुलला दोरीने गळा दाबून मारलं आणि त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >> ‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून

कुटुंबीयांनी नैसर्गिक मृत्यूचा रचला कट

पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबीयांनी अंशुलला नंतर एका खासगी रुग्णालयात नेले आणि तो झोपेत बेशुद्ध पडल्याचा दावा केला. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अकस्मात मृत्यूची नोंद डॉक्टरांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली. प्राथमिक हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, शवविच्छेदन अहवालात अंशुलची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची पुष्टी केली. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपांची कठोर चौकशी केली. अखेरीस आई आणि भावांनी गुन्ह्याची कबुली दिली. वादातून जीवघेणा हल्ला कसा झाला याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अनिता यादव, अमन यादव आणि कुलदीप यादव यांना अटक केली असून ते आता पोलीस कोठडीत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother broths killed 22 year old yout for wanting to cook chicken at home sgk