अमूल पाठोपाठ मदर डेअरी दूधही दोन रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. त्यामुळे मदर डेअरीचं पिशवीबंद दूध घ्यायचं असल्यास लिटरमागे दोन रुपये आणि अर्धा लिटरमध्ये एक रुपया जास्त मोजावा लागणार आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. अमूल आणि मदर डेअरी या दोन नामांकित कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले आहेत.

मदर डेअरी दुधाचे दर कसे वाढले?

बल्क व्हेंडेड मिल्क ५२ रुपये लिटर ऐवजी ५४ रुपये लिटर मिळणार

Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?

टोन्ड दूध ५४ रुपये लिटर ऐवजी ५६ रुपये लिटर झालं आहे

मदर डेअरी गायीचं दूध ५६ रुपये लिटरऐवजी आता ५८ रुपये लिटर

मदर डेअरी फूल क्रीम दूध ६६ ऐवजी ६८ रुपये लिटर

मदर डेअरी म्हशीचं दूध ७० ऐवजी आता मिळणार ७२ रुपये लिटर

डबल टोन्ड दूध ४८ रुपये लिटर ऐवजी ५० रुपये लिटर अशी दरवाढ करण्यात आली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये हे दर वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वीच अमूलने दरवाढ जाहीर केली. त्यापाठोपाठ हे दर आता आजपासूनच लागू करण्यात आले आहेत. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- जास्त दूध प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

अमूल आणि मदर डेअरी या दोन कंपन्यांच्या दूध दरांत वाढ

देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. शनिवारी (१ जून) निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. तसेच निवडणुकीच्या निकालासंदर्भातील एक्झिट पोलदेखील जाहीर झाले आहेत. उद्या (४ जून) या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. दरम्यान, निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे.

गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमूल दुधाच्या किंमतीत प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून (सोमवार, ३ जून) लागू झाल्या आहेत. जीसीएमएमएफने केलेल्या घोषणेनुसार अमुल दूध दोन रुपयांनी महागलं आहे. यामध्ये ‘अमूल गोल्ड’, ‘अमूल ताजा’, ‘अमूल शक्ती’चा समावेश आहे. ‘अमूल ताजा’ची सर्वात लहान पिशवी (पाव लिटर) वगळता इतर सर्व प्रकारच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तर आजपासून मदर डेरी या नामांकित कंपनीनेही दूध दर वाढ जाहीर केली आहे.

जीसीएमएमएफने यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. ही दरवाढ करत असताना कंपनीने म्हटलं आहे की “शेतकऱ्यांचा, दूध उत्पादकांचा वाढलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी आम्हाला ही दरवाढ करावी लागली आहे.” दुधाच्या किंमीत २ रुपयांची वाढ म्हणजेच एमआरपीमध्ये ३-४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. इतर अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा ही दरवाढ कमी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

Story img Loader