Man killed by his mother in Andhra Pradesh Andhra Pradesh Crime : आंध्रप्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील एका ५७ वर्षीय महिलेने स्वत:च्याच मुलाच्या वाईट वागणुकीला कंटाळून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने मुलाच्या मृतदेहाचे पाच तुकडे देखील केल्याचे शनिवारी पोलिसांनी सांगितले.

प्रकाशमचे पोलिस अधीक्षक ए.आर. दामोदर यांनी सांगितले की, के. लक्ष्मी देवी (५७) यांनी १३ फेब्रुवारी रोजी त्यांचा सफाई कर्मचारी असणारा मुलगा के. श्याम प्रसाद (३५) याची हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच देवी यांच्या नातेवाईकानी या हत्येत मदत केल्याचा देखील आरोप ठेवण्यात आला आहे.

नात्यातील महिलांवर बलात्काराचा प्रयत्न

आपल्या मुलाचा विकृतपणा आणि असभ्य वर्तन सहन न झाल्याने तिने (लक्ष्मी देवी) त्याची हत्या केली, असे पोलीस अधिकारी दामोदर यांनी पीटीआयला सांगितले. प्रसादने बेंगळुरू, खम्मम आणि हैदराबादमधील त्याच्या आत्यांबरोबर (Aunts) आणि इतर नातेवाईकांशीही असभ्य वर्तन केले होते.

प्रसादचे लग्न झालेले नव्हते आणि त्याने नरसरावपेटा येथील त्याच्या मावशींवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद याची कुऱ्हाड किंवा तशाच एखाद्या धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले. हे तुकडे तीन पोत्यांमध्ये भरण्यात आले आणि कुंबम गावातील नाकालगंडी कालव्यात फेकून देण्यात आले.

या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्यावर बीएनएस कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Story img Loader