१६व्या लोकसभेच्या गेल्या वर्षभरातील कामकाजादरम्यान विविध कारणांमुळे तब्बल २०६ शब्द आणि उपमा बाद ठरविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मदर तेरेसा, इंदिरा गांधी, शाहरूख खान आणि हिटलर अशा नावांचा समावेश आहे. हे सर्व शब्द गेल्या वर्षभरात लोकसभेत झालेल्या वेगवेगळ्या वादांशी संबंधित आहेत. त्यामुळे लोकसभेने हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याचा आणि यापुढे या शब्दांचा समावेश कामकाजात न करण्याचा निर्णय घेतला आहे. अवमानकारक, असंसदीय, वाईट अर्थाचे आणि एखाद्या परक्या गोष्टीशी संबंधित अशा चार विभागांमध्ये या शब्दांची वर्गवारी करण्यात आली
आहे.
उदाहरण द्यायचेच झाले तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार राजेश रंजन यांनी केलेला हिटलरचा उल्लेख अवमानकारक ठरविण्यात आला आहे, तर काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य िशदे यांनी मदर तेरेसा यांचा संदर्भ देऊन केलेले विधान आणि खासदार पी.संगमा यांनी शाहरूख खानचा संदर्भ देऊन केलेली विधाने परक्या गोष्टीशी संबंधित असल्याचे ठरवून त्यांचा लोकसभेच्या कामकाजात समावेश करण्यात आलेला नाही. खासदार प्रेम सिंग यांनी चंदू महाराज आणि इंदिरा गांधी यांच्या एकत्रितरीत्या केलेल्या उल्लेखाला माजी पंतप्रधानांचा अवमान असल्याचे ठरवत या सगळ्याचा उल्लेख कामकाजातून वगळण्यात आला आहे.
लोकसभेत उच्चारलेल्या असंसदीय शब्दांची यादी
* ‘नाजायज औलाद’, ‘धोका’ आणि ‘धोकेबाज प्रधानमंत्री’ – संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू
* ‘नंगे’, ‘दलाल’- खा. राजेश राजन
*‘चोर’- राहुल गांधी
* ‘टाय टाय फिस’, ‘जोकरो’ आणि ‘चमचो’- खा. मोहम्मद सालीम

लोकसभेने कामकाजातून वगळलेल्या उपमा
*भाजप खासदार यांनी वापरलेली ‘कोयला चोर’ ही उपमा
*खा. मोहम्मद सालीम यांच्या ‘लोकतंत्र का गला घोटना पडेगा’, ‘खामोश रहो आपका मुँह बंद किया जायेगा’ या उपमांना लोकसभेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.
*भाजप खासदार दिलीप सिंग यांनी उच्चारलेला ‘जिजा’ हा शब्दही लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला आहे.

Story img Loader