सर्वहिताय हा संस्कार भारतीय संस्कृतीच्या मुळाशी खोलवर रूजला असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी उज्जैन येथील कार्यक्रमात बोलत होते. आपण अशा संस्कृतीचा भाग आहोत की, जिथे साधा भिक्षुकही मला भिक्षा देणाऱ्याचे आणि न देणाऱ्याचेही भले होऊ दे, असे म्हणतो. प्राचीन भारतीय संस्कृती आधुनिक काळातील अनेक प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे. फक्त आपण स्वत:वर विश्वास ठेवणे आणि विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. श्रेष्ठपणाची भावना ही लोकांमध्ये वाद निर्माण करते. त्यामुळे अंतर्मनात डोकावून आपण स्वत:चा विकास कसा करू शकतो, हे पाहा, असे मोदींनी यावेळी सांगितले. सध्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडील निवडणूक प्रक्रिया जगातील एक आश्चर्य असल्याचे म्हटले. इतका मोठा देश आणि एवढे मतदार व निवडणूक आयोगाकडून करण्यात येणारे निवडणुकांचे व्यवस्थापन जगासाठी औत्स्युकाचे असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा