देशात ५ राज्यांमध्ये आता हळूहळू निवडणुका आणि त्याअनुषंगाने होणारा तुफान प्रचार याचा ज्वर चढू लागला आहे. यात ममता बॅनर्जी आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातलं ‘सख्य’ विख्यात असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. मात्र, त्यापाठोपाठ आता शेजारच्या आसाममध्ये देखील प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रमुख पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आसामच्या निसर्गम्य वातावरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच गर्मी वाढवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी आसाममधल्या त्यांच्या प्रचारसभेमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या काँग्रेसच्या दोन स्टार कॅम्पेनर्सवर खोचक शब्दामध्ये टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा