मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. रविवारी मुख्यमंत्री चौहान हे एका राजकीय सभेला संबोधित करण्यासाठी मनावरहून धार येथे जात होते. मनावर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. प्रसंगावधान दाखवत वैमानिकाने हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिग करण्यात आली.
तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर जेथून उड्डाण केलं होतं, तिथेच पुन्हा आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रस्ते मार्गाने धारच्या दिशेनं रवाना झाले. शिवराज सिंह चौहान ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ते हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं होतं. याबाबतचं वृत्त ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलं. शिवराज सिंह चौहान यांच्या धार येथे पाच राजकीय सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.