वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री (धीरेंद्र शास्त्री) यांना आता Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारने शास्त्री यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांना विरोध होऊ लागला आहे. दुसरीकडे त्यांच्या कार्यक्रमांना हजरोंच्या संख्येने गर्दी जमत आहे. एका बाजूला समर्थकांचा पाठिंबा वाढत असताना दुसऱ्या बाजूला शास्त्री यांच्या विरोधकांची संख्याही वाढू लागली आहे. अनेक संघटनांनी शास्त्री यांना आव्हानं दिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम सुरू आहे. याचदरम्यान त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बालाघाटमध्ये देखील त्यांनी हिंदू राष्ट्राचा जयघोष केला. शास्त्री म्हणाले की, हिंदू राष्ट्राचा मुद्दा हा जातीयवादी नसून सांस्कृतिक आहे. यावेळी त्यांनी रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी केली.

दरम्यान, शास्त्री यांनी नुकताच हनुमान कथेचा कार्यक्रम केला. शास्त्री समर्थकांनी दावा केला आहे की, या कार्यक्रमाला ३० लाख भक्त जमले होते.

हे ही वाचा >> देशातली उष्णतेची लाट ओसरली! ‘या’ सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

‘बागेश्वर धाम’वर लवकरच चित्रपट येणार

नॉस्ट्रम एंटरटेन्मेंट हब ‘द बागेश्वर सरकार’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे, तर विनोद तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदीबरोबरच इतर अनेक भाषांमध्येही बनणार आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी चित्रपट बनवण्यामागचा उद्देश सांगितला आहे. बागेश्वर सरकारचा गौरव आणि जगभरातील त्यांच्या अनुयायांचे प्रेम पाहून हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित आहे