मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील गैसाबाद ग्रामपंचायतीमधील एक अजब प्रकार समोर आला आहे. या ग्रामपंचायतीच्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या महिलांऐवजी त्यांच्या पतींनी आणि घरातील इतर पुरुष मंडळींनी पदाची शपथ घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी खुद्द ग्रामसेवकानेच मदत केली. या ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीतील एका महिलेची सरपंचपदी निवड झाली. त्यासोबतच ग्रामपंचायत सदस्य म्हणून इतर ११ महिलाही निवडून आल्या. मात्र, शपथविधी सोहळ्यात महिला सरपंचासह या महिला सदस्य कुठेही दिसल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आधी गेटवरही उभं केलं नाही अन् नंतर…; शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने संतोष जुवेकरला केला फोन, नेमकं काय घडलं?

२५ जून ते ८ जुलैदरम्यान ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. गैसाबाद ग्रामपंचायतीतील शपथविधी सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटनेची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय श्रीवास्तव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘गैसाबाद ग्रामपंचायतीत पार पडलेला बेकायदेशीर शपथविधी आमच्या निदर्शनास आला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाणार असून घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत’, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली. दरम्यान, निवडून आलेल्या महिलांसाठी पुन्हा शपथविधी सोहळा आयोजित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

‘काश्मीर’ मुद्द्यावरून चीनचे भारत-पाकिस्तानला आवाहन; म्हणाले, “वाद मिटवण्यासाठी…”

२० सदस्यीय या ग्रामपंचायतीत ११ महिला तर नऊ पुरुष सदस्य आहेत. या महिलांऐवजी त्यांच्या पतींनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. पुरुषांच्या या शपथविधी सोहळ्याचा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे. या घटनेवर विविध स्तरांमधून टीका देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, ओटीटी प्लॅटफार्मवर असलेल्या ‘पंचायत’ या सिरीजमध्येही अशाच प्रकारची घटना दाखवण्यात आली आहे. गावातील संस्कृती आणि राजकारणावर आधारित या सिरीजमध्ये पुरुषी मानसिकतेवर बोट ठेवण्यात आले आहे.