Manipur Women’s Violence Update : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत जमाव महिलांना विवस्त्र करून रस्त्याने घेऊन जाताना आणि नंतर एका शेतात घेऊन जाताना दिसला. यात जमावातील काही लोक पीडितेच्या शरीराला ओरबाडत विटंबना करत असल्याचंही दिसलं. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकसभेच्या खासदार हेमा मालिनी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मणिपूरची घटना समोर आल्यानंतर देशपातळीवरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातून याचे पडसाद उमटले आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. यावरून मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

हेही वाचा >> “महिलांचा एवढा अपमान…” मणिपूर घटनेवर जया बच्चन संतापल्या, म्हणाल्या, “तो व्हिडीओ…”

मणिपूरच्या व्हायरल व्हिडीओवर भाजपा खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, ” मणिपूर प्रकरणावर संसदेत चर्चा झालीच पाहिजे. ही चर्चा संसदेत होईलच. मणिपूरची घटना ही भयंकर आणि अमानवीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या प्रकरणावर बोलले आहेत. त्यामुळे या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल.”

मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड आणि लैंगिक अत्याचार

बुधवारी रात्री (१९ जुलै) सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

हेही वाचा >> Manipur Video : मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करत अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीच्या घराला आग

मणिपूर हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका, मात्र विवस्त्र धिंडीची दखल नाही

दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून अत्याचाराचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मणिपूर आणि दिल्लीत हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या. मात्र, तरीही गुन्हा दाखल होऊन ६२ दिवस हे प्रकरण अडगळीत पडल्याचंही समोर आलं आहे. २७ मे रोजी चिफ ऑफ आर्मी स्टाफ मनोज पांडे यांनी मणिपूरला भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला. २९ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चार दिवसीय मणिपूर दौरा करत सुरक्षाविषयक अनेक बैठका केल्या. तसेच विविध समाजघटकांशी चर्चा केल्या.