आज आणि उद्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मी कुणाच्याच बाजुची नाही, असं विधान केलं आहे.

पुढील दोन दिवस संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावर राहुल गांधीही बोलतील, तुमची भूमिका काय असेल? असं विचारलं असता नवनीत राणा म्हणाल्या, “तुम्ही कालचं राज्यसभेतील चित्र पाहिलं असेल तर आकडेवारीबाबत तुम्हाला सगळं समजलं असेल. एखादं विधेयक राज्यसभेत अशा आकडेवारीने पास होत असेल तर ही मोठी गोष्ट आहे. लोकसभेत तर काही प्रश्नच उरत नाही. यावरून मला काही वेळा हसू येतं तर काही वेळा खूप रागही येतो. कारण मी कोणत्याही बाजुची नाही, तर मी महिलांच्या बाजुची आहे. याबाबत माझं स्पष्ट मत आहे.”

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणता. तेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्याला धरून महिलांचा राजकारणासाठी वापर करता. यामुळे माझ्या मनाला खूप वेदना होतात. आज १२ वाजल्यापासून अविश्वास प्रस्तावावर बोललं जाणार आहे. विरोधी पक्ष स्वत:च्या राजकारणासाठी लोकांचा वेळ वाया घालवत आहेत. जे लोकहिताचे विधेयक होते, त्यावरून लक्ष हटवण्याचं काम या लोकांनी केलं आहे. आपल्या माहीत आहे, संबंधित प्रस्ताव लोकसभेत बहुमताने पास होणार आहे. त्याच पद्धतीने राज्यसभेतही पास होईल.

हेही वाचा- Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

विरोधी पक्षाला जर महिलांच एवढं महत्त्व होतं, असेल तर त्यांनी सभागृहात ९ विधेयक चर्चेविना पास होऊ दिली नसती. त्यावर चर्चा का नाही झाली? संबंधित ९ विधेयकांमध्ये संरक्षण, महिला आणि चित्रपटांशी संबंधित लोकांचे विधेयक होते. ही सर्व विधेयकं चर्चेविना पास झाली. फक्त आघाडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाने दिल्ली सेवा विधेयकामध्ये सहभाग घेतला. यातून त्यांची मानसिकता लक्षात येते, असंही नवनीत राणा म्हणाल्या. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.