विधानसभा निवडणुकीला तीन आठवडे उरले असतानाही मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षांनी अद्याप संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. दोन्ही पक्ष योग्य व परिपूर्ण उमेदवारांच्या शोधात असल्याचे समजते. मध्य प्रदेशमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (१ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे.
काँग्रेसच्या केंद्र व राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी नवी दिल्लीत या संदर्भात बैठका घेतल्या. मात्र उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबत अद्याप योग्य निर्णय घेता आला नाही. शुक्रवारी सकाळपर्यंत काही उमेदवारांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे. तिकिटांचे वाटप केल्यानंतर अनेक नेते, कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकू शकतात, अशी भीती वाटत असल्याने काँग्रेसने अद्याप उमेदवारांची नावे घोषित केलेली नसल्याचे समजते.
काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती भाजपमध्ये आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी तिकिटांची मागणी केली आहे. काही मतदारसंघातील विद्यमान आमदारांना व काही मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यास कार्यकर्त्यांचा विरोध असून, त्यांनी त्यासाठी आंदोलनही केले होते.

Story img Loader