चीनकडून वारंवार भारतीय हद्दीत होत असलेल्या घुसखोरीबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारताने चीनच्या घुसखोरीविरोधात कडक पावले उचलावीत, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.
भाजपचे सदस्य जगत प्रकाश नड्डा यांनी सभागृहात चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित केला. ११ ऑगस्ट रोजी चीनचे २५ सैनिक अरुणाचल प्रदेशातील चलगम भागात २० किमी आत घुसले होते आणि वास्तव्य केले. चीनची ही घुसखोरी १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर भारतीय लष्कराने त्यांना अटकाव केला. चीनच्या सैनिकांनी पुन्हा त्याच भागात १९ ऑगस्ट रोजीही घुसखोरी केल्याचे सांगत याप्रकरणी भारताने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्न नड्डा यांनी उपस्थित केला. तसेच चीनची वाढती घुसखोरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे म्हटले.
चिनी सैनिकांनी गेल्या तीन वर्षांत ६०० वेळा आणि त्यातही गेल्या आठ महिन्यांत १५० वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा करीत ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचे जगत प्रसाद नड्डा यांनी म्हटले.
दरम्यान, काँग्रेस, सपा तसेच भाजपच्या सदस्यांनीही नड्डा यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सरकारने चीनच्या घुसखोरीविरोधात कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली.
चीनच्या घुसखोरीविरोधात कडक पावले उचला
चीनकडून वारंवार भारतीय हद्दीत होत असलेल्या घुसखोरीबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारताने चीनच्या घुसखोरीविरोधात कडक पावले उचलावीत,
First published on: 23-08-2013 at 04:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mps demand strong steps to prevent chinese incursions