मुत्ताहिता क्वामी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) पक्षाचे आमदार आणि त्यांच्या पुत्राची शुक्रवारी येथील एका मशिदीबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.शुक्रवारचे नमाजपठण करून साजिद कुरेशी आणि त्यांचा पुत्र निझामाबाद परिसरातील एका मशिदीतून बाहेर पडताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात साजिद जागीच ठार झाले, तर त्यांचा पुत्र हॉस्पिटलमध्ये मरण पावला. ही घटना घडताच परिसरातील जनजीवन ठप्प झाले. सिंध असेंब्लीचे सदस्य म्हणून साजिद कुरेशी हे अलीकडेच निवडून आले होते. या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
पाकिस्तानात ‘एमक्यूएम’ पक्षाच्या लोकप्रतिनिधीची हत्या
मुत्ताहिता क्वामी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) पक्षाचे आमदार आणि त्यांच्या पुत्राची शुक्रवारी येथील एका मशिदीबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.शुक्रवारचे नमाजपठण करून साजिद कुरेशी आणि त्यांचा पुत्र निझामाबाद परिसरातील एका मशिदीतून बाहेर पडताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
First published on: 22-06-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mqms mla killed in pakistan