काय़महेंद्रसिंग धोनीच्या प्रत्येक हालचालीवर त्याच्या जगभरातील चाहत्यांकडून बारीक लक्ष ठेवले जाते. धोनी सध्या चेन्नईमध्ये आहे आणि येत्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ ची तयारी करत आहे. ९ एप्रिलपासून चेन्नई येथे आयपीएल सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर माजी भारतीय कर्णधाराचा नवीन लूक शनिवारी (१3 मार्च) व्हायरल झाला.

शनिवारी स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर धोनीची एक छोटी विडियो क्लिप शेअर केली आहे, त्याच्या डोक्यावर केस नाहीत, त्याने भिक्षूचे कपडे धारण केले आहेत. ही प्रतिमा काही वेळातच व्हायरल झाली आणि त्याच्या नवीन लूकमागील हेतू काय असू शकतो याचा अंदाज त्याच्या चाहत्यांनी लावायला सुरूवात देखील केली आहे.

धोनी हा आपल्या चाहत्यांना प्रत्येक हालचालीने चकित करण्यासाठी ओळखला जातो. या एका नव्या लूकमध्ये तो चाहत्यांसमोर प्रकट झाला आहे आणि “क्या है इस अवतार के पिछे का मंत्रा, जल्द ही आपको पता चलेगा” असे बोलून आपल्या चाहत्यांना त्याने आणखी भ्रमात टाकले आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर अकाऊंटने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट शेअर केली असून त्यास कॅप्शन दिले आहे की, “मंत्र… अवतार… आम्ही सुध्दा तुमच्या सारखेच विचारात पडलो आहोत”. धोनी ज्याबद्दल बोलत आहे, काय आहे हा मंत्र. याबद्दल तुमचा अंदाज आम्हाला सांगा आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत रहा.

येत्या आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी धोनीचा हा नवा लूक एका नवीन जाहिरातीसाठी असण्याची अपेक्षा आहे जी सहा शहरांमध्ये पार पडणार आहे .गेल्या काही वर्षांमध्ये, ३९ वर्षीय महेंद्रसिंग धोनीने आपल्या चाहत्यांना अनेकदा आश्चर्यचकित केले आहे.

प्रत्येकवेळा त्याच्या नवनवीन हेअरस्टाईलला प्रेक्षकांची योग्य वाहवा मिळाली आहे. अशा प्रकारे, त्याचे चाहते आता भिक्षू लुकमागील अधिक तपशील जाणून घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल (डीसी) विरूद्ध त्यांची मोहीम सुरू करणार आहे.

Story img Loader