देशात गेल्या काही दिवसात करोनाचा जोर ओसरत असल्याचं दिसत आहे. मात्र असं असलं तरी म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस या आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारावर होणारा खर्च पाहता अनेकांना धडकी भरते. त्यामुळे अनेकांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने जीवाला मुकावं लागत आहे. अँटी फंगल इंजेक्शनची किंमत पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. असं असताना आता ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारांचा खर्च १०० पटीने कमी करण्याचं एक सूत्र समोर आलं आहे. सध्या ब्लॅक फंगस झालेल्या व्यक्तीला दिवसाला जवळपास ३५ हजार रुपये खर्च होतो. म्हणजेच हा खर्च दिवसाला ३५० रुपयांपर्यंत आणण्याचं गणित बांधलं गेलं आहे. अनेकांना प्रश्न पडला हे गणित कसं शक्य आहे. रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन पातळी तपासणी केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो. दर दोन दिवसांनी रुग्णांची रक्त चाचणी करून त्यावर उपचार केले जाऊ शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
रक्तातील क्रिएटिनिनची पातळी वाढली तर ठराविक अंतराने किंवा कमी कालावधीत औषध दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शरीराचं संतुलन राखण्यास मदत होते. रक्तातील क्रिएटिनिन हे मूत्रपिंडाद्वारे तयार केलेला कचरा असतो आणि तो शरीरात जास्त प्रमाणात जमा झाल्यास धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे दर दोन दिवसांनी रक्तातील क्रिएटिनिनची चाचणी केल्यास उपचारात मदत होऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई होणार; मुंबईच्या महापौरांचा इशारा
ब्लॅक फंगसच्या उपचारात एम्फोटेरेसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. मात्र सध्याच्या स्थितीत या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. इंजेक्शनची किंमत अधिक आणि उपलब्धता नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे याच औषधाचा दुसरा पर्याय शोधणं आवश्यक आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च १०० पटीने कमी होईल अशी उपचार पद्धती लागू करणं गरजेचं ठरेल. त्यामुळे त्याला लिपोसोमल एम्फोटेरेसिन पर्याय ठरू शकेल. या दोन्ही औषधांचा प्रभाव सारखाच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र यासाठी डॉक्टरांनी रुग्णांच्या रक्तातील क्रिएटीनिन पातळी तपासणे गरजेचं आहे. २१ दिवसानंतर रक्तातील क्रिएटिनिन पातळी वाढली तर उपचारांची मात्रा बंद केली पाहीजे, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’! केजरीवाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
दरम्यान गेल्या काही दिवसात ब्लॅक फंगसची वाढतं प्रकरणं पाहता दिल्ली हायकोर्टानं चिंता व्यक्त केली होती. तसेच एम्फोटेरेसिन इंजेक्शनच्या तुटवडा पाहता ब्लॅक फंगसवर उपचारांसाठी लिपोसोमल एम्फाटेरिसिन बी औषध वितरणाबाबत धोरण आखण्यास सांगितलं होतं.