देशात गेल्या काही दिवसात करोनाचा जोर ओसरत असल्याचं दिसत आहे. मात्र असं असलं तरी म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस या आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारावर होणारा खर्च पाहता अनेकांना धडकी भरते. त्यामुळे अनेकांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने जीवाला मुकावं लागत आहे. अँटी फंगल इंजेक्शनची किंमत पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. असं असताना आता ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारांचा खर्च १०० पटीने कमी करण्याचं एक सूत्र समोर आलं आहे. सध्या ब्लॅक फंगस झालेल्या व्यक्तीला दिवसाला जवळपास ३५ हजार रुपये खर्च होतो. म्हणजेच हा खर्च दिवसाला ३५० रुपयांपर्यंत आणण्याचं गणित बांधलं गेलं आहे. अनेकांना प्रश्न पडला हे गणित कसं शक्य आहे. रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन पातळी तपासणी केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो. दर दोन दिवसांनी रुग्णांची रक्त चाचणी करून त्यावर उपचार केले जाऊ शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा