काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींनी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या औषध तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला जावा. तसेच, त्यांनी Liposomal Amphotericin-B च्या तुटवड्यावरून कारवाईची मागणी करत, अन्य आरोग्य विम्यांमध्ये म्युकरमायकोसिसला कवर करण्याची देखील विनंती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनिया गांधींनी म्हटले आहे की, “भारत सरकारने केवळ राज्यांना म्यूकरमायकोसिसला महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करणयास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, याच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. याचबरोबर उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल.”

‘म्युकरमायकोसीस’वरील जीवरक्षक औषधासाठी केंद्राला साकडे!

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणतात, “मी समजू शकते की त्यांनी Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. हा आजार आयुष्मान भारत व बहुतांश आरोग्य विम्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यांनी पुढे लिहिले की, म्युकरमायकोसिसग्रस्त अनेक रूग्णांना दिलासा मिळावा यासाठी, मी तुमच्याकडे याप्रकरणी तत्काळ केली जाण्याची आग्रहपूर्वक मागणी करत आहे. ”

याचबरोबर, करोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी  गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली होती.

करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना विनामूल्य शिक्षण द्या

या लहानग्यांवर जे संकट ओढवले आहे त्यामधून सावरण्यास त्यांना मदत करणे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल करणे हे देशावरील दायित्व आहे. त्यामुळे करोनामुळे ज्या मुलांवरील पालकांचे छत्र हरवले आहे त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती आपल्याला पत्राद्वारे करीत असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.