Mukesh Ambani advise to students over useing ChatGPT : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तरुण विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते पंडित दीनदयाल एनर्जी यूनीव्हर्सिटी (PDEU) च्या १२व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)च्या वापराबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी एआयचा वापर करून घेण्याबरोबरच स्वत:ची बुद्धी वापरून विचार करण्याचे कौशल्य देखील विकसित करण्याबाबत सल्ला धिला. तसेच विद्यार्थ्यांनी फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नये असा सल्ला देखील दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले?

अंबानी म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी बोलायचे झाल्यास, माझा तरुण विद्यार्थ्यांना एक सल्ला आहे. तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणून वापर करणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने आले पाहिजे, पण स्वतःची क्रिटिकल थिंकिंग सोडून देऊ नका. चॅजीपीटीचा नक्की वापर करा, पण लक्षात ठेवा कृत्रिम बुद्धीने नव्हे, स्वत:च्या बुद्धीनेच आपण प्रगती करू शकतो.”

मुकेश अंबानी यांचा व्हिडीओ वृत्तसंस्था एएनआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिज भारतात जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारण्याच्या विचारात आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार हे सेंटर गुजरातच्या जामनगर येथे असेल, याच्या माध्यमातून रिलायन्स ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही जागतिक स्तरावर एआय तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Navidia कडून एआय सेमिकंडक्टर्सचे देखील विकत घेत आहे. या दोन बड्या कंपन्या भारतात एआय संबंधी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. यासंबंधीची घोषणा ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या चर्चेदरम्यान घोषणा करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani advise to students over using chatgpt and artificial intelligence marathi news rak