समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर केलेल्या टीकेची भाजप व काँग्रेस या विरोधकांनी खिल्ली उडवली आहे.
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीमुळे मुलायम यांनी शनिवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव तसेच अन्य मंत्र्यांची खरडपट्टी काढली. मुलायम यांचा हा पवित्रा म्हणजे शहाजोगपणा असल्याचे भाजपने म्हटले आहे.  
मुलायम यांच्या या आवाहनावर काँग्रेसनेही तोंडसुख घेतले. जो पक्ष सत्तेत आहे, तो आपल्यावरील जबाबदारीपासून दूर कसा काय पळू शकतो असा सवाल केला आहे.

Story img Loader