संसदेत इंग्रजी बोलण्यावर बंदी घालण्यात यावी ,अशी मागणी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी आज केली आहे.
काल रात्री येथे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की संसदेत इंग्रजीत भाषण करण्यावर बंदी घातली पाहिजे. जे देश त्यांची मातृभाषा वापरतात तेच देश जास्त विकसित असतात, त्यामुळे संसदेत हिंदूीला प्राधान्य देण्याची हीच योग्य वेळ आहे.
इटवाह हिंदी सेवा ट्रस्टच्या हिंदी प्राधान्य कार्यक्रमात सहभागी व्यक्तींना उद्देशून ते म्हणाले, की हिंदीला उत्तेजन देण्याबाबत आपल्या देशातील नेते दुटप्पी वागत आहेत. ते हिंदीत मत मागतात, पण संसदेत मात्र इंग्रजीतून भाषणे करतात. हे थांबले पाहिजे. असे असले तरी आपण इंग्रजी भाषेच्या विरोधात आहोत असा नाही.
मुलायमसिंग यादव म्हणाले, की विविध भागांत राहणाऱ्या लोकांनी प्रादेशिक भाषेशिवाय हिंदीला उत्तेजन दिले पाहिजे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी असा इशारा दिला, की केंद्र सरकारने चीनवर फार विश्वास ठेवू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा