समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी देशात इतर पक्षांच्या नेत्यांवर हिंदी भाषेच्या बाबतीत द्वेषची भावना असल्याबाबत संसदेमध्ये इंग्रजीत भाषण करण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘इटावा हिंदी सेवा ट्रस्ट’ आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी हिंदी भाषेचा प्रसार करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. हल्ली नेते मतं मागण्यासाठी लोकांशी हिंदीमध्ये संवाद साधतात, मात्र संसदेत इंग्रजीत भाषण करतात, असंही ते पुढे म्हणाले.
मुलायम सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या देशांनी आपल्या मातृभाषेला सरकारी कामकाजाच्या भाषेचा दर्जा दिला, त्यांनी अधिक प्रगती केली आहे. इतर देशात हिंदी भाषेबाबत आपुलकिची भावना वाढत असतानाच भारतीय लोक हिंदीपासून दूर चालले आहेत, असंही मुलायम सिंह म्हणाले. आपण इंग्रजीच्या विरोधात नाही असा खुलासाही त्यांनी पुढे केला.
विविध प्रदेशात राहणा-या लोकांनी आपल्या स्थानिक भाषेसोबत हिंदीचाही प्रसार करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Story img Loader