नरेंद्र मोदींनी गुजरात दंगलीत मुसलमानांची हत्या घडवून आणली होती. दंगली दरम्यान मोदींनी मला गुजरातमध्ये येऊ नका अशी धमकीच दिली होती असे सांगत समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. अहमदाबादमधील एका प्रचार सभेदरम्यान बोलताना सिंह यांनी कॉंग्रेस पक्षावरही जोरदार टीका करत दोन्ही राष्ट्रीय पक्ष हे देशहित विरोधी असल्याचा आरोप केला.
गुजरातमध्ये देशातील सर्वाधिक प्रदुषित नद्या आहेत. गुजरातमध्ये काहीही नाही, असे सिंग यांनी सांगितले. मी खोटी आश्वासनं देत नाही. पण काही लोक खोटी आश्वासनं देतात. त्यांची खोटी आश्वासनं उत्तरप्रदेशमध्ये चालणार नाही असा टोला त्यांनी मोदींना लगावला. कॉंग्रेस पक्षाच्या हातात देशाच्या सीमाही सुरक्षित नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. केंद्र सरकार दिलेली आश्वासन पूर्ण करत नाही. आमच्या रॅलीत मोदींच्या रॅलीपेक्षा जास्त गर्दी होते असा दावाही त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा