बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षाने भाजपविरोधी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने जनता परिवारात धावपळ सुरू आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव व संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली.
या भेटीत मुलायमसिंहांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा दिल्याने ही आघाडी तोडण्यात आली. तर सर्व काही व्यवस्थित होईल, असा विश्वास शरद यादव यांनी व्यक्त केला. या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजवादी पक्ष भाजपच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप शरद यादव यांनी फेटाळला. काही दिवसांपूर्वी मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. तर सोमवारी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतल्याचे वृत्त होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू होती.

Story img Loader