उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे आज पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. मुलायम सिंह यादव तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तर १९९६ ते १९९८ दरम्यान त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, राजकारणात येण्यापूर्वी ते कुस्तीपटू होते. एकदा कवी संम्मेलनात तर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची जमिनीला पाठ लावली होती. हे असो किंवा स्वत:च्याच मृत्यूची घोषणा करण्याचे दिलेले आदेश असो, ५५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक प्रसंगांचा धीराने सामना करत विरोधकांवर मात करण्याचा प्रयत्न केला. मुलायमसिंहांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या घटना जाणून घेऊया.

कवी संमेलनात पोलीस कर्मचाऱ्याला इंगा दाखवला

२६ जून १९६० रोजी मैनपुरी येथील जैन इंटर कॉलेजच्या प्रांगणात कविसंमेलन सुरू होते. यावेळी विद्रोही कवी दामोदर स्वरूपही उपस्थित होते. त्यांनी व्यासपीठावरून ‘दिल्ली की गद्दी सावधान’ ही कविता सादर करायला सुरूवात केली. ही कविता सरकारच्या विरोधात असल्याने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोरील माईक खेचून त्यांना कविता म्हणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी २१ वर्षीय मुलायमसिंह यादव यांनी व्यासपीठावर जात पोलीस कर्मचाऱ्याला थोपवलं आणि आपल्या ताकदीची चुणूक दाखवली.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू

जेव्हा स्वत:च्या मृत्यूची घोषणा करण्याचे आदेश दिले

४ मार्च १९८४ रोजी मुलायम सिंह यांनी इटावा आणि मैनपुरी येथे सभा घेतल्या. सभेनंतर ते एका मित्राला भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्या गाडीवर अचानक शूटर छोटेलाल आणि नेत्रपाल यांनी नेताजींच्या गाडीसमोर येत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी चालकाने सावधानता दाखवत गाडीची दिशा बदलली. त्यामुळे गाडी एका नाल्यात गेली. आपल्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे मुलायमसिंहांच्या लक्षात आले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रसंगावधान राखत त्यांनी कार्यकर्त्यांना आपला मृत्यू झाल्याचे सांगा असे आदेश दिले.

कारसेवकांवर गोळी चालवण्याचे दिले होते आदेश

१९८९ मध्ये मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ९०च्या दशकाच्या सुरुवातीला देशभरात मंडल-कमंडल असा संघर्ष सुरू झाला होता. यादरम्यान, कारसेवकांनी बाबरी पाडण्याचा प्रयत्न केला. ३० ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवकांचा जमाव अनियंत्रित झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी निर्णय घेत पोलीस अधिकाऱ्यांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या दोन दिवसानंतर २ नोव्हेंबर १९९० रोजी हजारो कारसेवक हनुमान गढीजवळ पोहोचले. मुलायमसिंह यादव यांनी पोलिसांना पुन्हा एकदा गोळीबार करण्याचे आदेश दिले. यात काही कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडीओ –

लोहिया-आंबेडकर करार अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न

१९५६ मध्ये राम मनोहर लोहिया व बाबासाहेब आंबेडकर एकत्र येण्याचा विचार करत होते. मात्र, त्याच दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला आणि लोहिया यांची समाजातील शोषित अशा दोन घटकांना एकत्र आणण्याची योजना यशस्वी होऊ शकली नाही. १९९२ मध्ये बाबरी पाडल्यानंतर मुलायम यांनी लोहियांची ही योजना पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळचे दलितांचे नेते कांशीराम यांच्याशी युती करण्याची त्यांनी घोषणा केली. त्याचा अपेक्षित परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. त्यावेळी सपा-बसपा युतीला १७६ जागा मिळाल्या होत्या. मुलायमसिंहांनी इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर ‘मिले मुलायम-कांशीराम, हवा में उड गए जय श्री राम’ अशी घोषणा उत्तर प्रदेशमध्ये खूप गाजली होती.

तरीही कल्याण सिंहांना दिले समर्थन

२००९ मध्ये कल्याणसिंह यांनी भाजपा सोडून अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी त्यांना पाठिंबा देताना मुलायमसिंहांनी सभा घेतली होती. कल्याणसिंह यांच्यावर बाबरी मशिद पाडण्यासंदर्भातले आरोप होते. मुलायमसिंह यांच्या या निर्णयाला आझम खान यांनीही विरोध केला होता. याचा परिणाम त्यांना निडणुकीतही भोगावा लागला. मात्र, मुलायमसिंह यांच्या पाठिंब्यानंतर त्या निवडणुकीत कल्याणसिंह विजयी झाले होते.

Story img Loader