समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांना शुक्रवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुलायम यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे गुडगावमधील मेदान्ता रुग्णालयात आणण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप, थंडी व खोकला झाला होता. त्याबरोबरच मुलायम यांना श्वास घेण्यातही अडचण जाणवत होती. त्यामुळे त्यांना सुरूवातीला लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी काही चाचण्या केल्यानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. मात्र, काल रात्री त्यांचा त्रास पुन्हा वाढल्याने त्यांना मेदान्तामध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, मुलायम यांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमूने तपाणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांची लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत पण आत्ताच काही सांगता येणार नाही. तपासणीचे रिपोर्ट आल्यावर सगळे स्पष्ट होईल, अशी माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा