उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपाने बसपाच्या व्होटबँकेवर डोळा ठेवून मागासवर्गीयांना चुचकारण्याचे धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सपा आपल्या ‘सामाजिक न्याय अधिकार’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला ५ जानेवारीपासून सुरुवात करणार आहे. अनुसूचित जातींच्या यादीत १७ अतिमागास जातींचा समावेश करावा ही मागणी रेटण्यासाठी या यात्रेचे प्रयोजन आहे. ही यात्रा ५ जानेवारीला सुरू होऊन झाशी येथे ती ११ जानेवारी रोजी समाप्त होणार आहे. झाशी येथे मुलायमसिंग यादव यांची सभा होणार आहे, असे यात्रेचे निमंत्रक आणि मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांनी सांगितले.
मागासवर्गीयांना चुचकारण्याचा मुलायमसिंहाचा प्रयत्न
उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपाने बसपाच्या व्होटबँकेवर डोळा ठेवून मागासवर्गीयांना चुचकारण्याचे धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे.
First published on: 03-01-2014 at 12:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulayam singh yadav to target backward castes votes