उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपाने बसपाच्या व्होटबँकेवर डोळा ठेवून मागासवर्गीयांना चुचकारण्याचे धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सपा आपल्या ‘सामाजिक न्याय अधिकार’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला ५ जानेवारीपासून सुरुवात करणार आहे. अनुसूचित जातींच्या यादीत १७ अतिमागास जातींचा समावेश करावा ही मागणी रेटण्यासाठी या यात्रेचे प्रयोजन आहे. ही यात्रा ५ जानेवारीला सुरू होऊन झाशी येथे ती ११ जानेवारी रोजी समाप्त होणार आहे. झाशी येथे मुलायमसिंग यादव यांची सभा होणार आहे, असे यात्रेचे निमंत्रक आणि मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in