तमिळनाडूत एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक एकमेकांना धडक दिल्यां हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी मदत जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील थोप्पूर घाटात हा अपघात झाला. या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओत एक भरघाव ट्रक मागून येत आहे. ट्रकनं पुढं असलेल्या ट्रकला आणि अन्य वाहनांना धडक दिली. दोन्ही ट्रकच्यामध्ये अडकून कारचा चक्काचूर झाला. एक ट्रक उड्डाणपुलावरून खाली कोसळला. तर, दोन ट्रकने पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multiple vehicles collide in tamil nadu 4 dead 8 injured ssa