पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाला भारतीय साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले असून त्याबाबतचा दस्तऐवज सादर करण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर मुंबईवरील दहशतवादी खटल्याची सुनावणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने २ मार्चपर्यंत पुढे ढकलली.
पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने पहिल्यांदा भारतभेटीवर येऊन चार साक्षीदारांच्या उलटतपासणीचा सादर केलेला अहवाल न्यायालयाने फेटाळला. साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यास परवानगी नाकारण्यात आली हे कारण त्यासाठी न्यायालयाने दिले होते. त्यामुळे न्यायिक आयोग आता पुन्हा भारतभेटीवर येणार आहे.
भारताने साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची अनुमती दिली असल्याचे मुख्य सरकारी वकील चौधरी झुल्फीकार अली यांनी न्यायालयास सांगितले. तथापि, त्याबाबतचा लेखी दस्तऐवज न्यायालयात सादर करावा, अशी आग्रही मागणी लखवीचे वकील अहमद यांनी केली. तेव्हा पुढील सुनावणीच्या वेळी भारत सरकारकडून मिळालेली लेखी मान्यता सादर केली जाईल, असे अली यांनी न्यायालयास सांगितले.

Story img Loader