एका टोळीने मुंबई तसेच इतर शाहरांमध्ये जिगोलो (वेश्या व्यवसाय करणारा पुरुष) म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत ३५० पेक्षा जास्त पुरुषांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या टोळीतील इतर सदस्य फरार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सात मोबाईल फोन तसेच सात सीमकार्ड जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या अभिषेक सिंग या आरोपीचे बँक खातेदेखील पोलिसांनी गोठवले आहे.
नेमका प्रकार काय?
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार एका टोळीने मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधील ३५० पेक्षा जास्त पुरुषांची फसवणूक केली आहे. ‘जिगोलो’चे काम देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्यांपैकी एकाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. महिला ग्राहकांसोबत वेळ घालवण्यासाठी या टोळीकडून पुरूषांना वेगवेगळ्या ‘फ्रेंडशीप ग्रुप’मध्ये सामील होण्याचे आवाहन केले जायचे. त्यानंतर पुरूषांना हॉटेल्सचा पत्ता दिला जायचा. रुममध्ये प्रवेश करण्याअगोदर याच टोळीचा एक सदस्य हॉटेलमध्ये यायचा. त्यानंतर महिला ग्राहकांना प्रभवित करण्यासाठी या पुरुषांना भेटवस्तू खरेदी करण्यास सांगितले जायचे. ऑनलाईन पद्धतीने पैसे दिल्यानंतर हे पुरूष हॉटेलमध्ये प्रवेश करायचे. मात्र हॉटेलमध्ये कोणीही नसायचे.
हेही वाचा >>> आफताब तिहार जेलमध्ये आत्महत्या करु शकतो? अधिकाऱ्यांना भीती, कर्मचाऱ्यांना आदेश देत म्हणाले “त्याच्याजवळ…”
तक्रारदार पुरुषाने दिलेल्या माहितीनुसार जिगोलो बनण्यासाठी पुरुषांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून अगोदर १५०० आणि नंतर दोन महिन्यांसाठी काम करायचे असेल तर आणखी १५०० रुपये घेण्यात आले. मागील आठवड्यात तक्रारदाराला एका थ्री स्टार हॉटेलमध्ये जाण्याचे सांगण्यात आले. त्या अगोदर महिला ग्राहकासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्याकडून ६५०० रुपये घेण्यात आले. तसेच हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या टोळीने तक्रारदाराला ११ हजार रुपये मागितले.
हेही वाचा >>> उद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून! पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो
दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तापस केला. पोलिसांनी अभिषेक सिंग नावाच्या आरोपीला अटक केली. या आरोपींने सुजित अनिल सिंग, छोटू सिंग, किरण सिंग या इतर अरोपींची नावे घेतली आहेत. यापैकी छोटू सिंग यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार आहेत. तपासादरम्यान अभिषेक सिंग याच्या बँक खात्यावर ७.२७ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी आरोपीचे बँक खाते गोठवले आहे. तसेच त्याच्याकडून एकूण ७ मोबाईल फोन आणि ७ सिमकार्ड जप्त केले आहेत.