मुंबई निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारमधून ५० लाखांची रोकड जप्त केली आहे. ताडदेव भागात आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्रशांत समदानी नावाच्या एका व्यक्तीकडून ही रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. सध्या देशाच्या वेगवेगळया भागात मोठया प्रमाणावर रोकड जप्त करण्यात येत आहे.