गुजरात पोलिसांनी एका अट्टल चोराला नुकतीच अक केली आहे. अनेक राज्यात त्याने बऱ्याच चोऱ्या केल्याचे सांगितले जाते. मागच्या महिन्यातच वापीमध्ये एक लाख रुपयांची चोरी केल्यानंतर रोहित सोलंकी नावाचा हा चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रोहितची चौकशी केल्यानंतर आणि त्याची ऐशआरामातील जीवनशैली पाहून पोलिसांनाही धक्का बसला. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत १९ चोऱ्या केल्याचे मान्य केले. एवढंच नाही तर रोहित सोलंकी हा मुंबईत एक कोटी किंमतीच्या फ्लॅटमध्ये राहत असून त्याच्याकडे आलिशान ऑडी कार असल्याचेही चौकशीतून समोर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित सोलंकीने गुजरातमध्ये बहुतेक चोऱ्या केल्या होत्या. वलसाड येथे तीन, सुरतमध्ये एक, पोरबंदर आणि सेलवल येथे एक, तेलंगणा, आंद्रप्रदेश आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी दोन चोऱ्या केल्या होत्या. तर महाराष्ट्रातही एक चोरी केली असल्याचे कबुली रोहितने दिली.

अनंत अंबानींच्या लग्नासाठी मुंबईच्या वाहतुकीत बदल; वरूण ग्रोव्हर म्हणाले, “राजेशाहीमुळे अराजकता…”

रोहित सोलंकीवर अनेक राज्यात गुन्हा दाखल झालेला असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच त्याने आपले नाव अरहान असे बदलून एका मुस्लीम महिलेशी विवाह केल्याचेही उघड झाले.

वलसाड पोलिसांनी रोहित सोलंकीच्या चोरीची पद्धतही उघड केली. सोलंकी आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करायचा. तसेच विमानाने प्रवास करायचा. हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना तो हॉटेलची गाडी बुक करून दिवसा प्रवास करत असे. चोरीची योजना आखण्यासाठी तो दिवसा नागरी सोसायटींची पाहणी करायचा.

चोरीच्या पैशांतून चैनीत जगण्याची सोलंकीला सवय जडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील नाईटक्लबमध्ये त्याचे नेहमी येणे-जाणे असायचे. तो अनेकदा क्लबमधील पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायचा. तसेच त्याला अमली पदार्थांचेही व्यसन होते. यासाठी तो दर महिन्याला दीड लाख रुपये खर्च करत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai flat worth rs one crore audi car gujarat rich thief in police net kvg
Show comments