‘इसिस’ संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या नवी मुंबईतील झुबेर अहमद या कथित पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
आपण आपल्या भारतीय पारपत्राचा त्याग करून इस्लामिक स्टेट या संघटनेत सामील होण्यास तयार आहोत, असे झुबेर अहमदने समाजमाध्यमांवर जाहीर केले होते. ‘जर्नालिस्ट फॉर इंटरनॅशनल पीस’ नावाच्या वृत्तपत्राचा प्रमुख संपादक असल्याचा दावा त्याने फेसबुकवरील पोस्टमध्ये केला होता. आपण राजधानी एक्स्प्रेसने ४ ऑगस्टला दिल्लीला पोहोचणार असल्याचेही त्याने लिहिले होते.
आपण दिल्लीतील इराकी दूतावासात जाणार असून, परराष्ट्रविषयक घडामोडींचा प्रवक्ता किंवा सरकारी पत्रकार म्हणून इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे निवेदन देणार आहोत. आपला भारतीय पासपोर्ट ‘सरेंडर’ करण्याचीही आपली इच्छा आहे. दिल्लीतील पाच दिवसांच्या वास्तव्यात आपण पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला भेट देऊन
आपल्या व्हिसा अर्जावर लवकर निर्णय घेण्याची विनंती करू, असेही त्याने म्हटले होते.
‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या झुबेर अहमदला अटक
‘इसिस’ संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या नवी मुंबईतील झुबेर अहमद या कथित पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-08-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai journalist who wanted to join islamic state arrested